breaking-newsमनोरंजन

रजनीकांतच्या “काला’मधील पहिले गाणे रिलीज

सुपरस्टार रजनीकांत लवकरच “काला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील पहिलेवहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे कामगार दिनाच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, त्याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. हे गाणे तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आले. “बहुत भारी है…’ असे बोल असणारे हे हिंदी गाणे सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. काही मराठी शब्दांचा वापरही रॅप प्रकारात असणाऱ्या या गाण्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

“काला’ रुपातील रजनीकांत यांचा दाक्षिणात्य ठेका असलेल्या या गाण्यातील लूक लक्षवेधी ठरत असल्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. या गाण्याला खास असा रॅप सॉंगचा टच रोहित फर्नांडिस, हरिहरसुधन आणि संतोष नारायण यांनी दिला आहे. या गाण्यासाठी डोप डॅडी, टोनी सायको, एमसी मवाली, अर्जुन कामराज यांनी रॅप आणि बिट बॉक्‍सिंग केले आहे. पीए रंजित दिग्दर्शित “काला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार होता. पण, एक मार्चलाच तामिळ चित्रपटसृष्टीतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे आता कालाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, थेट 7 जूनला सुपरस्टार रजनी प्रेक्षकांच्या भेटीला येतील. नाना पाटेकर, हुमा कुरेशी, समुद्रकणी, इश्वरी राव हे कलाकारही वंडरबार फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button