breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीलेख

योगामुळे कमालीची कार्य क्षमता वाढते; योग ही फक्त इलाजपद्धती नसुन ती एक जीवन- योगसाधक डॉ. सुनील गंधे

योगामुळे कमालीची कार्य क्षमता वाढते.
योगसाधक डॉ सुनील गंधे यांचा स्वानुभव
योग ही फक्त इलाजपद्धती नसुन ती एक जीवन प्रणाली आहे. जो व्यक्ती आयुष्यात योग हा जीवनपद्धती म्हणून स्वीकारेल त्यास निरोगी दीर्घायुष्य प्राप्त तर होइलच पण त्याच्या कार्यक्षमतेत कमालीची वाढ होते असा स्वानुभव डॉ सुनील गंधे यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक योग दिनाचे आैचित साधुन आमच्या प्रतिनिधींनी गेली ४० वर्ष सातत्याने योगाभ्यास व योग प्रचार करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील जखणगांव चे रहिवासी असणाऱ्या जगभर योगामुळे प्रसिद्ध प्राप्त झालेल्या डॉ सुनील गंधे यांचेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनाची कहाणी सविस्तर सांगितली त्यातील सारांश. आईवडील डॉक्टरी पेशात असल्याने ते मुलांच्या आरोग्य व शिक्षणाबाबत अधिक जागरुक होते त्यामुळे लहानपणापासूनच योग, व्यायाम, आहार व अभ्यास याची रोजची सवय झाली.आई वडील दोघेही पूर्वी शिक्षक असल्याने शिस्त व नियमित पणा आम्हा भावंडात अनायास आला. लहानपणीच योगाचे धडे मी गीरवु लागलो. खेड्यात शाळा शिकत असुन सुद्धा शिक्षणेतर उपक्रमात भाग घेण्यास संधी मिळाली व आमचा व्यक्तीमत्व विकास विना क्लास चा विनाशुल्क झाला.
पुढे वैद्यकीय शिक्षण घेत असताना शहरातील विविध योग संस्थांचा संबंध आला.

योगविद्दाधाम, सत्य साई योग व अध्यात्म केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली, सहजयोग, एसएसवाय, स्वाध्याय, गायत्री परिवार अशा विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करण्याची व त्यांच्या यौगीक शिक्षणाची संधी मिळाली त्यामुळे साधनेत सातत्य टीकले तसेच योगात वैयक्तिक प्रगती झाली.
काॅलेज ला वैद्यकीय शिक्षण घेत असताना प्रात्यक्षिक अनुभव अधिक लवकर या म्हणून मी काॅलेज सुटल्यावर वेगवेगळ्या हाॅस्पीटलमध्ये काम करायचो . वयाच्या १८ वर्षापासून मी रोज २० तास काम करतो ते आजसुद्धा करत आहे. योगसाधना केल्याने आपल्या शरीरात प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. कितीही काम केले तरी थकवा जाणवत नाही. चिडचिड होत नाही. संयमी व शांत स्वभाव ही आपली शक्तिस्थाने तयार होतात. कामात व्यस्त राहिल्याने फालतु उद्योग करायला वेळच शिल्लक राहात नाही.योगामुळे आहाराचे प्रमाणही आपोआप कमी होते.आहार कमी झाल्यामुळे आळस व झोपही कमी होते.योगाभ्यासामुळे स्मरण शक्ती, आकलन शक्ती व नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विशेष शक्ती प्राप्त होते.

पुढे योगाबरोबरच अध्यात्म व परमार्थ शास्राचा अभ्यास करण्याचे भाग्य मिळाले व तेव्हा असे लक्षात आले कि योग, अध्यात्म व परमार्थ हे एकमेकांशी जोडले गेले आहेत. हे निरोगी जीवनाला पुरक उपक्रम आहेत.ज्ञान, भक्ती व कर्म हे प्रमुख योगाचे अंग आहेत. त्यामुळे सात्विक प्रवृत्ती निर्माण होते.
गेली ३० वर्ष वैद्यकीय व्यवसाय करत असताना कधी कधी २४ चोवीस तास सलग काम करावे लागते. पण योगाभ्यासामुळे थकवा जाणवत नाही , कार्यक्षमता तसेच उत्साह कमी होत नाही. कामाचा लोड वाढला, जेवणाची वेळ टळुन गेली, जागरण झाले तरी अस्वस्थता निर्माण झाल्याचे मला आठवत नाही.

योग शिक्षणात
योग शिक्षक (क्वालिटी काॅन्सिल आॅफ इंडिया)
फेलोशिप इन योग थेरपी (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)
डिप्लोमा इन योगा
अशा अनेक उच्च शिक्षणातील पदव्या व पदविका प्राप्त करण्याचा योग आला.
योग प्रचारासाठी भारतात व परदेशात अनेक वेळा संधी मिळाली
सुमारे ३२ देशात आत्तापर्यंत योग प्रचारासाठी जाण्याचा योग आला.
भारतातील प्रत्येक राज्यात योगप्रचारानिमित्त जाता आले.
योगाने मला पर्यटन घडवले
योगात प्रावीण्य मिळविल्यानंतर भारत सरकारने माझी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक राजदूत या पदावर नियुक्ती केली व दक्षिण आफ्रिका येथील डर्बन शहरातील आय सी सी आर च्या कार्यालयाची जबाबदारी दिली आहे व तेथून अफ्रीका खंडात योग व भारतीय संस्कृती चा प्रचार करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
माझ्या आहारात ही योगामुळे अमुलाग्र बदल झाला आहे.
मी गेली २५ वर्ष एक वेळा कच्चा आहार घेतो.
याची नगर मुक्कामी बाबा रामदेव यांनीही दखल घेतली होती व आश्चर्य व्यक्त केले होते.
मी जो काही आज आहे तो योगामुळे च.
माझ्या आयुष्यात जे चांगले क्षण आले ते योगामुळे व जे कटु अनुभव असतील तो माझा योगरहीत क्षण आहे असे मी मानतो.
मी दवाखान्यात आयुर्वेद व अधुनिक उपचाराबरोरच योग करण्याचा सल्ला देतो
योगामुळे सर्व आजार निट होऊ शकतात.
मानवी जीवन निरोगी करायचे असेल , फिजीकल व मेंटल फिटनेस अबाधित ठेवायचा असेल तर योगसाधना हा एकमेव पर्याय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button