breaking-newsताज्या घडामोडीपुणे

येरवडा महापालिका रुग्णालयात कोरोना लसीचा ‘ड्राय रन’

२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस  

पुणे | प्रतिनिधी

देशासह राज्यात कोविडच्या लसीची रंगीत तालीम सुरु आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविडची लस दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. या रंगीत तालमीत २५ आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.

या वेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल आग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. शुभांगी लोकरे, डॉ. रेखा गलांडे, डॉ. स्वाती पाटील आदीसह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणासाठी घेण्यात आलेली रंगीत तालीम यशस्वी झाली असल्याची माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. रंगीत तालीमसाठी २५ लोकांना बोलाविण्यात आले होते. सकाळी सव्वा दहा वाजता रंगीत तालीम सुरु झाली. ही तालीम १२ वाजून ४५ मिनिटे पर्यंत चालू होती. या वेळी कोविड अपमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव नोंद करण्यात आले. या वेळी कोणतीही अडचण आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, ड्राय रनची चाचणी घेतल्यानंतर त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 30 मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या साठी येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात हि मोहीम आयोजित करण्यात आली. शहरात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यासाठी ५०० मेडिकल ऑफिसर व नर्सेसची टीम तयार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button