breaking-newsराष्ट्रिय

येत्या 31 मार्च पर्यंत दिल्लीत फ्री वायफाय सेवा

नवी दिल्ली – संपुर्ण दिल्लीवासियांना येत्या 31 मार्च पर्यंत पुर्ण मोफत इंटरनेट सेवा वायफाय मार्फत देण्याचे लक्ष तेथील आम आदमी पक्षाच्या सरकारने निश्‍चीत केले आहे. आम आदमी पक्षाने निवडणुक जाहीरनाम्यात हे आश्‍वासन दिले होते त्याची पुर्तता यानिमीत्ताने केली जाणार आहे. हे काम वेगाने होण्यासाठी त्याचे नियंत्रण माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून काढून घेऊन ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

तथापी गेल्या मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत हे काम करण्याविषयी या विभागाने असमर्थता दर्शवली होती. या कामाचा अनुभव असलेली तज्ज्ञ मंडळी आणि पुरेसा कर्मचारी वर्ग आमच्याकडे नाही असे त्यांनी सरकारला कळवले होते. दिल्ली सरकारने सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात वायफाय सेवेसाठी 100 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. हा प्रकल्प कशा प्रकारे राबवायचा याची तीन ते चार मॉडेल तयार करण्यात आली आहेत. त्याची कार्यक्षमता आणि उपयुक्तता तपासून त्यातील एक मॉडेल निश्‍चीत करून दिल्लीकरांना ही सुविधा मोफत पुरवली जाणार आहे असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्ली सरकारने मार्च 2016 मध्ये संतनगर मार्केट मध्ये तीन महिन्यांसाठी या मोफत वायफायचा पायलट प्रोजेक्‍ट राबवला होता. त्यानंतर ही ठिकाणे पाचशे पर्यंत वाढवण्यात येतील असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते पण ते काम अद्याप अपुर्णच राहिले आहे. आता नवीन स्कीम नुसार पुढील वर्षाच्या मार्च पर्यंत सर्वच नागरीकांना ही मोफत सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button