breaking-newsराष्ट्रिय

येत्या ४८ तासात मान्सून अंदमानात धडकणार?

मुंबई : अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असून येत्या ४८ तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘मेकुनू’चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा आल्याने त्याचे दक्षिण अंदमान समुद्रातील आगमन लांबले आहे, परंतु, आता हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने दूर गेले असून मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

२७ आणि २८ मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले २५ ते २८ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button