breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पा यांचे भावूक भाषण

बंगळुरू – कर्नाटक विधानसभेत आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडल्या. आज सकाळी आमदारांचा शपथविधी होता. मात्र अनेक आमदार उशिरा पोहोचल्याने आमदारांच्या पळवापळवीची चर्चा होती. त्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

दुपारी साडेतीन वाजता कर्नाटक विधानसभेच कामकाज पुन्हा सुरु झाले. यावेळी येडियुरप्पा यांनी अत्यंत भावूक भाषण केले. त्यांनी कन्नडी भाषेत कर्नाटकातील कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. कॉंग्रेसप्रणित सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात विकासकामे केली नाहीत. केंद्राच्या निधीचा वापर केला नाही.

मी आतापर्यंत जनतेसाठी काम करत आलो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जनतेसाठीच काम करत राहीन, असे भावूक भाषण येडियुरप्पा यांनी केले. त्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button