breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युपीएससीचे निकाल जाहीर, महाराष्ट्रातील सृष्टी देशमुख देशात पाचवी

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे. या परीक्षेत कनिष्क कटारिया-पहिला, अक्षत जैन-दुसरा, जुनैद अहमद-तिसरा, श्रवण कुमार-चौथा, सृष्टी देशमुख-पाचवी, शुभम गुप्ता- सहावा, कर्नाटी वरुणरेड्डी- सातवा, वैशाली सिंह- आठवा, गुंजन द्विवेदी नववी, तर तन्मय शर्मा दहावा आला आहे.

तर तृप्ती धोडमिसे ही 16वी, वैभव गौंदवे हा 25वा आला आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे. पहिल्या 50मध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 759 विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी 180 जणांनी आयएएस, 30 जणांनी आयएसएस, 150 जणांनी आयपीएस रँक मिळवला आहे. ग्रुप ए मधून 384, ग्रुप बीमधून 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यातून जावे लागते. तसेच त्यांची खासगी मुलाखतही घेतली जाते. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button