breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम करणारा सोनू सूद एक यशस्वी अभिनेता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे चर्चेत आहे. कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला. त्याने विविध माध्यमातून गरजुंना मदत केली. या कार्याबद्दल सोनू सूदला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी (29 सप्टेंबर 2020) संध्याकाळी व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button