breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘या’ राज्यात दारुची होम डिलिव्हरी होणार !

शिलाँग | मेघालय सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दारुची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारावर दारुची होम डिलिव्हरी केली जाणार आहे. आरोग्याची जीवनावश्यक गरज म्हणून गरजू ग्राहकांसाठी ही तात्पुरती सोय करुन दिली जात असल्याची माहिती मेघालय सरकारने दिली आहे.

यापूर्वी केरळमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दारुची होम डिलिव्हरी करणारं मेघालय हे दुसरं राज्य ठरलं आहे. आरोग्यासाठी आवश्यक म्हणून मेघालय सरकारने दारुची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच ही दारु दिली जाणार आहे, असं मेघालय प्रशासनाने स्पष्ट केलं. विशेष बाब म्हणून १४ एप्रिलपर्यंत दारुची विक्री करता येईल, असं एक्साईज विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button