यामुळेच शरद पवारांची पुण्यातील ती नियोजित मुलाखत झाली रद्द
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित मुलाखत रद्द झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्यामुळे ही नियोजित मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
पुण्यामध्ये साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानमार्फत २८ आणि २९ डिसेंबर रोजी आयोजित १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार होती. शिवसेना खासदार संजय राऊत हे मुलाखत घेणार होते. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्यामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे.
येत्या काही दिवसातच मुलाखत आयोजित करण्यात येईल, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि. दा. पिंगळे यांनी दिली आहे. दरम्यान, साहित्यिक कलावंत संमेलनातील उर्वरित सर्व कार्यक्रम नियोजित वेळेतच होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.