breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘यशस्वी’ संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

पिंपरी |महाईन्यूज|

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सतर्फे चिंचवड येथील कॅम्पसमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते.

याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांमध्ये परस्परांप्रती एकात्मतेची, राष्ट्रीयत्वाची भावना अखंड जोपासली जावी यासाठी आजच्या राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. परकीयांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील विविध संस्थानांच्या विलीनीकरणाचे अत्यंत जोखमीचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, त्यांच्या या देशकार्याला वंदन करून राष्ट्रीयत्वाची प्रेरणा जोपासुया असे आवाहन डॉ.मुंढे यांनी केले.

यावेळी प्रत्यक्ष उपस्थित अध्यापकांनी व ऑनलाईनपद्धतीने उपस्थित असणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सामुहिक शपथ पठण केले. याप्रसंगी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून संस्थेतील मोजके अध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.महेश महांकाळ यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button