breaking-newsताज्या घडामोडीपुणे

यंदाही सर्व शिक्षा अभियानाचा बोजबारा

विद्यार्थ्यांची शंभर टक्के खाते खोलण्यास शिक्षण मंडळाला अपयश ः

यंदाही शिष्यवृत्तीचे चेकद्वारे आणि साहित्यांचे होणार वाटप

पिंपरी (विकास शिंदे) :  सर्व शिक्षा अभियानातंर्गत महापालिकेच्या शिक्षण मंडळात डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, पुस्तकांची रक्कम आणि महापालिकेकडून मोफत दिल्या जाणा-या शालेय साहित्यांची रक्कम अशी एकत्रित लाभाची रक्कम त्या-त्या मुला-मुलींच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार होती. परंतू, विद्यार्थ्यांची शंभर टक्के खाते काढण्यास शिक्षण मंडळाला अपयश आल्याने सर्व शिक्षा अभियानाचा बोजबारा उडाला आहे.

लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी डीबीटी योजना राबविण्याचा आदेश राज्य शासनाने सर्व महापालिकांना दिला होता. तसेच राज्य सरकारने आॅनलाइन कारभार करण्यावर भर दिला आहे. परंतू, सर्व शिक्षा अभियानातंर्गत विविध योजनांचा थेट लाभ देण्यापासून गरीब विद्यार्थ्यांन फटका बसणार आहे.  राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, पुस्तके, तसेच महापालिकेकडून दिले जाणारे मोफत शालेय साहित्यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक केले आहे. मात्र, यंदाही विद्यार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार नाही. महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची शंभर टक्के बँक खाती उघडण्यास अपयश आले आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या आर्थिक वर्षांत पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेणा-या सर्व घटकातील विद्यार्थीना गणवेश, पी. टी. गणवेश, स्वेटर, पादत्राणे व सॉक्‍स, पी. टी. शूज, दप्तरे व पाट्या, पावसाळी साधने आदी साधने देण्यात येतात. त्याशिवाय मुला-मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते.

दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पालकांना विद्यार्थ्याचे शून्य रकमेवर बँक खाते उघडण्यास सांगितले होते. परंतू, बॅंक खाते उघडण्यास पालकांना अडचणी सामना करावा लागत आहे. काही बँका शून्य रकमेवर जॉइंट अकाउंट उघडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शंभर टक्के खाते न उघडण्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाला यंदाही विद्यार्थ्यांचा खात्यात थेट रक्कम देण्यास अडचण निर्माण होवू लागली आहे. यामध्ये  सर्व शिक्षा अभियानातंर्गत एकूण विद्यार्थी पट संख्या 37 हजार 939 आहे. त्यात बँक खाते उघडलेले विद्यार्थी संख्या 20 हजार 655 एवढी आहे. तर बँक खाती न उघडलेले विद्यार्थी 17 हजार 284 एवढी आहे. त्यामुळे तब्बल 17 हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बॅंकेत खाते न काढल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट लाभ देण्यास यंदा अडचण आलेली आहे. त्यामुळे चालू शैक्षणि वर्षात देखील विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप आणि शिष्यवृत्ती चेकद्वारे दिली जाणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button