breaking-newsमनोरंजन

…म्हणून हर्षदाची बिग बॉसच्या घरात झाली एन्ट्री

मराठी बिग बॉसमध्ये रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरेच्या रोमान्सची जोरदार चर्चा आहे. आता बिग बॉसच्या घरात अभिनेत्री हर्षदा खानविलकरच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत आक्कासाहेब बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हर्षदा खानविलकरची बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री झाली. पहिल्यात एपिसोडमध्ये रोखठोक मतांनी, प्रश्न आणि उत्तरांनी तिने सगळ्यांची मने जिंकली.

दरम्यान बिग बॉसला अपेक्षित टीआरपी मिळत नव्हता. त्यामुळे हर्षदाला घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. आक्कासाहेब ही व्यक्तिरेखा साकारताना पुढचे पाऊलचा टीआरपी चांगला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात असलेली हर्षदाच्या इमेज पाहता तिला बिग बॉसच्या घरात आणल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसच्या घरात येण्याआधी सकाळीच हर्षदाने एन्स्टाग्रामवर एन्ट्री केली होती. इन्स्टाग्रामवर येताच तिच्या फॉलोअर्संनी हजारोंचा टप्पा गाठला. आता बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे चॅनलची स्ट्रॅटेजी कामी आल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button