breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोस्ट वॉन्टेड गुंड विकास दुबेला मध्यप्रदेशात अटक

कानपूर | ८ पोलिसांच्या हत्याकांडातील मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबे याला मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विकास दुबे याने महाकालेश्वर मंदिरात पावती फाडली आणि त्यानंतर आत्मसमर्पण केले. सध्या स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. विकास दुबे यांच्या अटकेची माहिती यूपी पोलिसांनी दिली आहे.

विकास दुबेने आत्मसमर्पण केल्याची स्थानिक माध्यमांना माहिती दिली होती. यानंतर उज्जैनच्या महाकाळ पोलीस ठाण्याजवळ त्यांनी स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी विकास दुबे याला अटक केली असून त्याला महाकाल पोलीस ठाण्यात आणले आहे. आत्मसमर्पण केल्याच्या बातमीनंतर एसटीएफची टीम उज्जैनला रवाना झाली आहे.

विकास दुबे महाकाल मंदिरासमोर उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक मीडिया तेथे पोहोचताच त्याने मी विकास दुबे असल्याचं ओरडून सांगितलं. यानंतर स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाली. त्याला तातडीने अटक करण्यात आली आणि थेट महाकाल पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे त्याची चौकशी केली जात आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ‘सध्या विकास दुबे मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. अटक कशी झाली? याबद्दल काही बोलणे योग्य नाही. मंदिराच्या आतून किंवा बाहेरुन अटक केल्याबद्दल देखील सांगणे योग्य नाही. त्याने सुरुवातीपासूनच क्रौर्याची मर्यादा ओलांडली होती. घटनेबाबत आम्ही पोलिसांना सतर्क ठेवले होते.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button