मोरया गोसावी मंदिरात भाविकांची गर्दी
पिंपरी – अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त चिंचवडमधील महासाधू मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. सकाळी सहा वाजण्यापासून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनाला रांगा लावल्या आहेत. अंगारकीनिमित्त्त भरणार्या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झालेली दिसत आहे.
चिंचवड येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. मोरया गोसावी मंदीरात पहाटे अभिषेक व पूजेनंतर मंगलमूर्तीची धामिर्क विधिवत पूजा करण्यात आली. त्यांनंतर सकाळी सहानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या वेळी भाविकांनी रांगेत उभे राहून शांततेत दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने दर्शनास येणार्या भाविकांना ट्रस्टच्या वतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच गर्दीमुळे वाहतुकीचा मार्गही बदलण्यात आला होता.