breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मोबाईल नंबर मागणाऱ्या तरुणाची हत्या

मुंबई : पत्नीचा मोबाईल नंबर मागत असल्याच्या कारणावरुन पतीसह पत्नीने युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना चेंबुरमध्ये घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

चेंबुर येथील व्ही के कृष्णन मेनन चाळीत आरोपी पती यशवंत रामू झाडे आणि पत्नी मीना यशवंत झाडे राहतात. याच चाळीत राहणारा राकेश शिंदे हा मीना झाडे यांच्याकडे वारंवार मोबाईल नंबर मागत असे. याबद्दल मीनाने आपल्या पतीला सांगितलं. चिडलेल्या यशवंतने राकेशच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. राकेश बेशुद्ध पडल्यामुळे नातेवाईकांनी त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. टिळक नगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपी पती पत्नीला अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 25 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button