breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोदींच्या सुरक्षेसाठी मैदानाभोवती ६ फूट खंदक,कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाची भाजपला धास्ती

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २२ एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे प्रचार सभा होत आहे. मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असलेल्या या भागात गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांच्या रोषाला मोदींना सामोरे जाण्यास लागू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. बारा वर्षांपूर्वी डाळिंब परिषदेत नाशिकच्या शेतकऱ्यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर कांदे फेकले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मोदींची सभा होत असलेल्या ठिकाणी ऐनवेळी आंदोलकांची घुसखोरी टाळण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूंनी सुमारे ६ फुटांहून अधिक खोलीचे खंदक खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

जॉइंट फार्मिंग सोसायटीच्या ६८० एकर मैदानाच्या एका भागात मोदींची सभा होत आहे. जागा विस्तीर्ण असल्याने सुरक्षा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. गेल्या तीन- चार वर्षांपासून कांदे दर सातत्याने घसरत असल्याने या भागात शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे कांदा-टोमॅटोचे क्षेत्र असलेल्या पिंपळगाव बाजार समितीच्या शेजारील या सभेत कांदा किंवा टोमॅटो फेकीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपच्या सांगण्यावरून प्रशासनास विशेष दक्षता घेत आहे. त्यासाठी सभास्थळावर चारही बाजुंनी मोठा खंदक खोदून बॅरिकेडिंग केले जात आहे. या कामासाठी येणाऱ्या मजुरांचीही लेखी नोंद घेतली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button