breaking-newsआंतरराष्टीय
मोदींचे पाक अध्यक्षांशी हस्तांदोलन
क्विंगदाओ – शांघाय परिषदेच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच पाकिस्तनाचे अध्यक्ष मामून हुसेन हेही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मोदी आणि अध्यक्ष हुसेन यांच्यात आज हस्तांदोलन आणि अनौपचारीक चर्चाही झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या राजकीय चर्चेची प्रक्रिया पुर्णपणे थांबलेली आहे या पार्श्वभूमीवर या हस्तांदोलन आणि अनौपचारीक संवादाला महत्व आहे.
या परिषदेला आठ राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित आहेत. त्यातील सुमारे सहा राष्ट्रप्रमुखांशी मोदींनी व्यक्तीगत स्वरूपात द्विपक्षीय चर्चा केली पण त्यांनी पाकिस्तानी अध्यक्षांशी मात्र अशी चर्चा केली नव्हती. पाकिस्तानात सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने तेथे हंगामी पंतप्रधान कार्यरत असल्याने अध्यक्ष मामून हुसेन यांनी या परिषदेत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले.