breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
मोदींचे ट्विट | पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन
नवी दिल्ली: | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढणाऱ्या करोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारताने कोविड-१९ शी लढाई सुरू केली असून करोनाविरुद्धच्या या लढाईत देशातील सर्व वर्गातील लोकांनी आर्थिक योगदान देण्याची ईच्छा बोलून दाखवली आहे. या मुळे जनतेतू आलेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग अडचणींवर मात करण्यासाठी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले आहे . पंतप्रधानांनी ट्विटद्वारे हे आवाहन केले आहे.
माझे देशातील जनतेला आवाहन आहे की देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे. या फंडाचा उपयोग पुढील काळातील अडचणीच्या काळावर मात करण्यासाठीही करता येणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे या फंडाबाबत तपशील सांगणारी एक लिंक देखील शेअर केली.