breaking-newsराष्ट्रिय

‘मोदींचा अर्थ’ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय – काँग्रेस प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधान

मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान केले आहे. पवन खेडा यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवन खेडा यांचे हे वादग्रस्त विधन काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्याता आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर मोदी बद्दल केलेल्या विधानाचा मुद्दा उचलला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पवन खेडा मोदी यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य करताना म्हणाले की, MODI यांचा अर्थ मसूद अजहर, ओसामा, दाऊद आणि आयएसआय आहे. या चर्चेत भाजपाकडून पक्षाचे प्रवृक्ते संबित पात्रा सामील झाले होते. पवन खेडा यांच्या वक्तव्यवर त्यांनी आक्षेप घेत ते म्हणाले की, हे आपत्तीजनक वक्तव्य आहे. ‘देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसोबत कशी करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत पवन खेडा यांनी माफी मागावी अशी मागणी केली.’

वादग्रस्त वक्तव्यानंतर पवन खेडा ट्विटरवर चर्चेचा विषय होते. हजारो नेटीझन्सही पवन खेडा यांच्याबद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरूनही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ भाजपाने पोस्ट केला आहे.

Embedded video

BJP

@BJP4India

Congress Spokesperson Pawan Khera says that MODI stands for Masood, Osama, Dawood and ISI.

Do we need enemies like Pakistan when we have Congress?

10.7K people are talking about this

भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस प्रवृक्ता पवन खेडा यांनी मोदी यांचा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा सांगितला आहे. आपल्यालाजवळ काँग्रेस असताना पाकिस्तानसारख्या दुश्मनाची गरज काय आहे? जर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले तर काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button