breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोठी बातमी: शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा अखेर राजीनामा

  • पिंपरी-चिंचवड शिवसेनेतील गटबाजीचा उद्रेक
  • खासदार श्रीरंग बारणे गटाची कलाटे गटावर कुरघोडी

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड शिवसेनेतील गटबाजीचा मंगळवारी उद्रेक झाला. महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी अखेर राजीनामा द्यावा लागला. स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीवरून झालेल्या राजकीय चढाओढमध्ये खासदार श्रीरंग बारणे गटाने कलाटे गटावर यशस्वी कुरघोडी केली आहे.

यावेळी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मिनल यादव, अश्विनी वाघमारे, विशाल यादव, विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते.

स्थायी समिती सदस्यपदावरून झालेल्या वादनंतर शिवसेना पक्षश्रेष्ठीनी कलाटे यांना राजीनामा द्या, असा आदेश दिला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी राजीनामा पाठवला होता. काल पक्षाकडून मेलद्वारे कळवण्यात आले की, विभागीय आयुक्तांकडे राजीनामा सुपूर्द करावा. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे, अशी माहिती स्वतः कलाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितली.

शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग केल्याने आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याने राहुल कलाटे यांना शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी खुलासा मागवत १० फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून कलाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नुकतीच आठ सदस्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी पक्षाचा आदेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिले. कलाटे यांनी पक्ष आदेशाचा भंग केला असल्याचा ठपका त्यांच्यावर होता. त्यापार्श्वभूमीवर राहुल कलाटे यांनी त्यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा आज दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button