breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मे.प्राईम सर्जिकल’ ठेकेदार बनला मध्यवर्ती भांडार विभागाचा ‘जावई’

कोरोना काळात अधिकारी-कर्मचारी साधताहेत संधी; निविदा न राबविता सव्वा दोन कोटीची थेट खरेदी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागात सहायक आयुक्तासह अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाची चांगलीच संधी मिळाली आहे. एकीकडे कोरोना संसर्गाचा उपद्रव आणि दुसरीकडे वैद्यकीय विभागाची तत्काळ मागणी दाखवून ठेकेदाराशी अर्थपुर्ण वाटाघाटी करुन संगणमताने थेट खरेदीचा जणू सपाटा लावला आहे. विशेषता अल्प मुदतीचे निविदा प्रक्रिया न राबविता कित्येक ठेकेदारांना मागील प्राप्त लघुत्तम दराने कोट्यावधीचा खरेदी करण्यात येवू लागली आहे. यामध्ये मे. प्राईम सर्जिकल अॅन्ड फार्मा या ठेकेदाराकडून तब्बल सव्वा दोन कोटीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे मे.प्राईम सर्जिकल ठेकेदार मध्यवर्ती भांडार विभागाचा जावई आहे का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा पिंपरी चिंचवड शहरात चांगलाच फैलाव होवू लागला आहे. दररोज शेकडो रुग्ण पाॅझिटिव्ह होवू लागले आहेत. त्यात मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. याच संधीचा गैरफायदा महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गाकडून घेतला जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाची संधी ओळखून सहायक आयुक्तासह अन्य अधिकारी व कर्मचा-याकडून मलई काढण्याचा प्रकार सुरु आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य विभागाची तत्काळ मागणी दाखवून अत्यावश्यक खरेदीच्या नावाखाली पालिका तिजोरीवर खुलेआम दरोडा टाकण्याचे काम वरिष्ठ अधिकारी ते कनिष्ठ कर्मचारी करु लागले आहेत. महापालिकेच्या बालनगरी व आॅटोक्लस्टर येथील आयसीयू व दोन बेडसाठी आवश्यक खरेदी आरोग्य विभाग आणि वायसीएम रुग्णालय अधिष्ठाता यांच्या पत्राने केली. आरोग्य विभागाची मागणी आणि वैद्यकीय विभागाच्या अल्प मुदतीच्या जाहीर सुचनेनूसार थेट खरेदी करण्याचा अनागोंदी सुरु आहे. तसेच मागील प्राप्त लघूत्तम मंजूर दरपत्रकधारक मे. प्राईम सर्जिकल अॅन्ड फार्मा यांचेकडून सिरींज पम्प, पोर्टेबल ई.सी.जी. मशीन, मल्टीपॅरा माॅनिटरची थेट खरेदी करण्यात येत आहे. त्याकामी तब्बल दोन कोटी 37 लाख 18 हजार दोनशे रुपयाच्या खर्चास कार्याेत्तर मान्यता देण्यासाठी स्थायी समिती सभेपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button