breaking-newsमनोरंजन

मेगन मार्कलने मोडला ब्रिटीश राजघराण्याचा आणखी एक नियम

 

राजघराणं म्हटलं की त्याचे नियमसुद्धा आलेच. प्रत्येक राजघराण्याचे काही नियम असतात आणि ते कुटुंबीयांना पाळणं गरजेचं असतं. ब्रिटीश राजघराण्याचेही असेच काही नियम आहेत. ब्रिटीश राजघराण्याची सून ‘डचेस ऑफ ससेक्स’ मेगन मार्कल हिने पुन्हा एकदा नियम मोडीत काढला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात राजघराण्यातील सदस्यांना वेशभूषा आणि पोशाखाबाबत विशेष नियम पाळावे लागतात. पण मेगनला बंधनात राहणं फारसं आवडत नाही. नुकतीच तिने ब्रिटीश फॅशन अॅवॉर्ड्समध्ये हजेरी लावली. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याला साजेशी काळी नेलपेंट तिने लावली होती. आता यामुळे कोणत्या नियमाचा भंग होतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ब्रिटीश राजघराण्यातील महिलांना गडद रंगाची नेलपेंट लावण्याची परवानगी नाही. मेगनने काळ्या रंगाची नेलपेंट लावत हा नियम मोडला आहे.

याआधी राणी एलिझाबेथ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये मेगननं केलेल्या वेशभूषेमुळे सर्वसामान्यांचा रोष तिनं ओढावून घेतला. शाही कुटुंबातील महिलांसाठी ड्रेसकोडचे नियम कडक आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकजण ते काटेकोरपणे पाळतात. पण मेगन मात्र हे नियम पाळताना दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button