breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुस्लिम बांधवासाठी समाज मंदिर उभारणार – आमदार चाबुकस्वार

पिंपरी – मुस्लीम समाजासाठी त्यांची लग्न, इतर कार्यक्रम राबविण्यासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन  आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटीच्या वतीने रविवारी पिंपरीत मुस्लीम रिश्तो का जलसा हा वधूवर मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुलूस कमिटीचे अध्यक्ष हाजी गुलामरसूल सय्यद होते. यावेळी कमिटीचे सचिव हाजी अकबर मुल्ला, माजी अध्यक्ष इद्रिस मेमन, जाफर मुल्ला, सलीम सय्यद, रमजान शेख, रमजान आत्तार, इमरान बिजापूरे, मौलाना फैज अहमद, युसूफ कुरेशी, लतिफिया, जामा मशिदीचे मौलाना नसीबउल्ला अजीजी, याकुब खान, मुन्ना शेख, फैझल शेख, नियाम देसाई, मुश्ताक शेख, मौलाना नय्यर नुरी, अकबर मुल्ला, शफी मणीयार, खॉजा नदाफ, सल्लागार गुलामअली भालदार आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हयातील सुमारे 350 इच्छित लग्न करू इच्छिणार्‍या वधू वरांनी नावनोंदणी केली. मौलाना हाजी नजीबऊल्ला अजीजी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे युसुफ कुरेशी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अब्दल खय्यूम कुरेशी यांनी सूत्रसंतालन केले. हाजी गुलामरसूल सय्यद यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button