breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुसळधार पावसातही पोलीस काका ‘ऑनड्युटी’

मुंबई : कितीही जोराचा पाऊस असला तरी पावसामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते. आपल्या या कर्तव्यापासून मागे न हटता अनेक पोलीस कर्मचारी पावसात भिजत आपलं कर्तव्य निभावत असतात. अशाच एक पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अचानक पडलेल्या पावसामुळे एकीकडे मुंबईकर धावपळ करत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी नंदकुमार इंगळे मात्र भर पावसात भिजत आपलं कर्तव्य बजावत होते. अचानक पडलेल्या पावसाचा सामना करण्यासाठी ना त्यांच्याकडे छत्री होती, ना रेनकोट होता. मात्र तरीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ते पावसात भिजत वाहतूक सुरळीत राहावं याची काळजी घेत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button