breaking-newsआंतरराष्टीय

मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट स्थगित

  • देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई 

इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने आज माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट स्थगित केला. मुशर्रफ यांच्याविरोधात सुरु असलेल्या खटल्याला मुशर्रफ अनुपस्थित राहिल्याने त्यांना देण्यात आलेल्या सवलती आणि प्रवासाची परवानगी स्थगित करण्याचे आदेश विशेष न्यालयाने सरकारला केली होती. त्यानुसार पाकिस्तान सरकारने ही कारवाई केली आहे. पाकिस्तानातील “नॅशनल डाटा बेस ऍन्ड रजिस्ट्रेशन ऍथोरिटी’ आणि पासपोर्ट संचलनालयाला याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.

पासपोर्ट स्थगित केल्यामुळे आता मुशर्रफ परदेशात प्रवास करू शकणार नाहीत. तसेच कोणत्याही स्वरूपाचे बॅंक व्यवहार करू शकणार नाहीत. त्यांना पाकिस्तान आणि परदेशातील त्यांच्या मालमत्तेची विक्री किंवा खरेदीही करता येणार नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे. विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना अटक करण्याचे आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही सरकारला दिले आहेत. पाकिस्तानमध्ये 2007 साली आणीबाणी लादल्याने मुशर्रफ यांच्याविरोधातल्या देशद्रोहाचा खटल्याची सुनावणी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button