breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुळशी धरणात 3 विद्यार्थी बुडाले, एका मुलीचा मृतदेह सापडला

पुणे, –  सहलीसाठी आलेल्या तिघांचा मुळशी धरणात तिघेजण बुडाल्याची घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील वळणे इथं पोहायला उतरलेले तीन विद्यार्थी बुडाले. यात दोन मुलांसह एका मुलीचा समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील वळणे इथं भारती विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. धरणात बुडालेल्या मुलांपैकी मुलीचं नाव संगीता नेगी असून शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार अशी दोन मुलांची नावे आहेत. एमबीएचं शिक्षण घेत असलेले हे विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिक,पोलीसाच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button