breaking-newsमनोरंजन

‘मुल्क’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

अभिनेत्री तापसी पन्नू आगामी ‘मुल्क’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये तापसी पुन्हा एकदा कोर्टात पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी ती आरोपीच्या कठड्यात नसून वकीलाच्या वेशात आहे. तापसीने सोशल मीडियावर हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ऋषी कपूरसुद्धा आहेत.

‘एक बार फिर अदालत होगी, कटघरा होगा, एक परिवार होगा, एक मानसिकता होगी और विरोध होगा,’ असं कॅप्शन देत तिने चित्रपटातील तिच्या भूमिकेचं नाव आरती असल्याचंही लिहिलं. २७ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत आहे.

‘मुल्क’मधून पुन्हा एकदा तापसी एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असून तिच्यातील चतुरस्त्र अभिनेत्रीचा पुरावा प्रेक्षकांना मिळणार आहे. यामध्ये तापसी आणि ऋषी कपूरशिवाय प्रतीक बब्बर, रजत कपूर, आशुतोष राणा, मनोज पाहवा आणि नीना गुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button