breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुले संवेदनशील असतात, त्यांच्यावर आपले विचार लादू नका : दिगंबर बिराजदार

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ज्ञानविस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पुणे येथील मुस्कान फाऊंडेशनचे समुपदेशक दिगंबर बिराजदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीश आयोजित या उपक्रमात व्यासपीठावरती प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, समन्वयक प्रा. सुशिल भोंग, व्याख्यात्या दिपाली दंडवते, व्याख्याते महेश शिंदे, रोहित वायकर उपस्थित होते. त्यांनी बालहक्क संरक्षण व महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परिक्षाची व संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
बालहक्क संरक्षण या विषयावर बोलताना समुपदेशक दिगंबर बिराजदार म्हणाले, 18 वर्षाच्या आतील मुलांचे भविष्य शिक्षक व आई-वडिलांच्या हातात आहे. याचे सतत भान ठेवले पाहिजे. काही पालक मुलांना मारणे, चटके देणे आदी प्रकार करतात. त्यांना घाबरून काही मुले शाळेतच जात नाही. काही मुलांचे वडील दारू पिणे, पत्नीबरोबर भांडणे तर काहींचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. यात मुलांचे योग्य संगोपन होत नाही. अनेक मुले नापासही होतात. इ.9 वीत नापास होणार्‍या मुलांचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे वाईट संगतीत काहीजण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, तर आर्थिक चणचणीत सापडलेली मुले लहान वयातच शाळेऐवजी हॉटेल, गॅरेज आदी ठिकाणी नोकरी करतात, असे केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचाराचे प्रमाणही अनेक ठिकाणी आढळून येत असून कायदे असले तरी पालक मुलांबरोबर लैंगिक शोषणाबद्दल जास्त चर्चा करीत नाही, मुले देखील सांगताना घाबरतात. वयोगट 18 वर्षाआतील मुलांना चांगल्या वाईटाची समज नसल्यामुळे वाम मार्गाला जात आहे. सरकारी आकडेवारीनूसार गुन्हेगारी क्षेत्रात वर्षभरात 45 हजाराहून अधिक मुले विविध गुन्ह्यात अडकलेली आहेत. देशभरात 1 कोटी 26 हजाराहून अधिक मुले बालकामगार म्हणून काम करतात. त्यात फक्त उत्तर प्रदेशातच जवळपास 19 लाख 27 हजार मुलांची संख्या आहे. तर गहाळ होणार्‍या मुलांचे प्रमाण 37 हजारांहून अधिक आहे. त्यातील 3 हजाराहून अधिक मुलांचा पत्ताच लागत नाही. देशात दिवसाला 98 मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडत आहे. देशाच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून आजच्या शिक्षण पद्धतीत काय बदल करता येईल, याबाबत चर्चा आवश्यक आहे. देशात बालसंरक्षण हक्क असले तरी, समानता मुलांचे हीत, त्याचा सहभाग जगण्याचा, संरक्षणाचा हक्क, शिक्षण, आरोग्य माहितीचा अधिकार याबाबत विशेष जनजागृती मोहिम तळागाळापर्यंत राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षकांनी विशेष पुढाकार घेवून प्रत्येक मुलगा स्पेशल आहे. मुलांचे विचार वेगवेगळे असतात. त्यांची मने दुखावणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता नाही, तर काळाचीच गरज आज आहे. आई-वडीलांनी देखील मुलांना योग्य वेळ देत नाही, तो दिला पाहिजे. काम जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच मुलांचे संगोपन देखील महत्त्वाचे आहे. आपण जन्माला घातलेल्या मुलांच्या गरजा वेळच्यावेळी पूर्ण केल्या पाहिजे. राज्यशासनाने व समाजानी सामूहिकपणे राज्यातील मुले व महिलांचा विचार करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यातरच तो मुलगा भविष्यात आपले घर योग्य पद्धतीने चालवेल.
महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परिक्षांची तयारी व संधी याबाबत व्याख्याते महेश शिंदे व रोहित वायकर महाविद्यालयीन मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत जातात, परंतू भावी ध्येय निश्चितीबाबतच अनेकजण अनाभिन्न असतात. अनेक पालक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिकवणी लावतात. परंतू महाविद्यालयातील तासीकालाच बसत नसतीलतर फारसा उपयोग होत नाही. ग्रामीण भागातील मुलांनी दररोज दोन इंग्रजीचे शब्दांचे पाठांतर केले, तर उज्ज्वल भविष्य निर्माण करता येते, 18 तास अभ्यास करण्यापेक्षा आठच तास करा, परंतू निश्चित केलेल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करू नका. आज स्पर्धा परिक्षाचे भांडवल केले जातंय. स्पर्धा परिक्षा ही हौसी लोकांची परिक्षा आहे. महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परिक्षेत बहूपर्यायी प्रश्न असतात, तर केंद्रीय स्पर्धा परीक्षा लिखाणाची आहे. त्यासाठी नेमका अभ्यास कसा करायचा हे कळले पाहिजे. सर्वच क्षेत्रात उच्चपद अधिकारी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवा. अनेकजण मिरवण्यात खूष राहतात. हा विचार सोडून दररोज दैनंदिन अभ्यासाबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे वाचण्याची सवय जोपासावी.
दोन दिवसीय कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थीनी मिनल दरेकर, पद्मिनी नायडू यांनी केले. तर आभार समन्वयक प्राध्यापक सुशिल भोंग केले व मिसबा मिराजपूरकर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button