breaking-newsमहाराष्ट्र

मुनगंटीवार टीका प्रकरण; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

चंद्रपूर :अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्याबद्दल ५० वर्षांच्या व्यक्तीला १५ जणांनी मारहाण केली होती. त्या १५ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रवीण शांतीलाल सुराणा यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी १५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये भाजपच्या वरोरा नगरपरिषदेचे सहकारी सदस्य, बाबा भगडे आणि इतर राजकीय पक्षाचे काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या १५ जणांवर आयपीसीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार हे काल सायंकाळी महात्मा गांधी उद्यानात शेडचे उदघाटन करण्यासाठी आले होते, पण उद्घाटन न करता ते निघून गेले. त्यानंतर, सुराना यांनी माध्यमांबरोबर बोलताना, मंत्र्यावर टीका केली.
मात्र मुनगंटीवार यांच्यावर टीका केल्यामुळे संतप्त भगडे आणि इतर कार्यकर्त्यांनी सुराणा यांना मारहाण केली. व पुन्हा टीका केल्यास भविष्यात गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील. अशी धमकी दिली आहे. असे सुराणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, जखमी झालेल्या सूराणा आणि इतर काही किरकोळ जखमींना वारोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button