breaking-newsराष्ट्रिय

मुद्दल फेडतो, व्याज विसरा; विजय मल्ल्याची बँकांना ऑफर

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचं प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. विजय मल्ल्या म्हणतो, किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही अनेक राज्यांना मदत केली होती. पण दुर्दैवाने किंगफिशर एअरलाइन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे. यामुळे बँकांचेही नुकसान होणार नाही, असे त्याने सांगितले.

Vijay Mallya

@TheVijayMallya

Airlines struggling financially partly becoz of high ATF prices. Kingfisher was a fab airline that faced the highest ever crude prices of $ 140/barrel. Losses mounted and that’s where Banks money went.I have offered to repay 100 % of the Principal amount to them. Please take it.

एअरलाइन्स कंपनीला विमानाचे इंधन महागल्याचा फटका बसला. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांना १०० टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

Vijay Mallya

@TheVijayMallya

I see the quick media narrative about my extradition decision. That is separate and will take its own legal course. The most important point is public money and I am offering to pay 100% back. I humbly request the Banks and Government to take it. If payback refused, WHY ?

प्रसारमाध्यमं आणि नेतेमंडळी माझ्यावर बँकांचे कर्ज बुडवून पसार झाल्याचा आरोप करतात. पण त्यात तथ्य नाही. मला निष्पक्ष वागणूक का दिली जात नाही, असा सवाल त्याने विचारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button