breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मुख्य निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 5 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक महिन्यांपासून निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य परीक्षेत 2 हजार 728 उमेदवार पात्र ठरले आहेत.

गेल्या नऊ महिन्यांपासून उमेदवार पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या निकालाची वाट पाहात होते. आयोगाने औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार हा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व परीक्षेची गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या निकालानुसार शारीरिक चाचणीस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचे शारीरिक चाचणीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. अपात्र ठरेलल्या उमेदवारांना त्यांच्या गुणपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करण्यासाठी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविण्याच्या दिनांकापासून 10 दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उमेदवारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर 2016 मध्ये आयोगाने 650 पीएसआय पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार दि. 16 जुलै 2017 रोजी पूर्व परीक्षा झाली. पीएसआय मुख्य परीक्षेच्या निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र ठरले असून, त्यांची आता शारीरिक चाचणी परीक्षा आणि मुलाखत ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पीएसआयचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button