breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

मुख्यमंत्र्यांसमोर महापाैराचा खुलासा; कोरोनाने झालेल्या एक हजार मृत्यूची नोंद नाही!

पुणे – पुणे शहरात आत्तापर्यंत साधारणत: एक हजार कोरोनामुळे झालेले मृत्यू हे रोजच्या आकडेवारीत नोंदविलेच गेले नसल्याचा धक्कादायक खुलासा पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उध्दवर ठाकरे यांच्यासमोर केला आहे. या प्रकरणी चाैकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

पुण्यात दररोज बारापेक्षा अधिक मृत्यू हे कोरोनाबाधितांचे असतात. मात्र मृत्यूपूर्वी त्यांची स्वॅब तपासणी नसल्याने ती गणना यात केली गेलेली नाही. पण मृत्यू पश्चात होणाऱ्या तपासणीत ते निष्पन्न झाले आहे, असे खुद्द ससून रूग्णालय प्रशासनाने केंद्रीय पथकाला सांगितले आहे. त्यामुळे पुण्यात साधारणत: साडेचारशे ते पाचशे मृत्यू अशारितीने महिन्याला होत असतील तर, पुण्याचा मृत्यूदर हा निश्चितच दुप्पटीने वाढणार आहे असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना कबुल केले. हे सांंगतानाच मोहोळ यांनी, आकडेवारी लपविण्याचा यामागे कोणाचाही उद्देश नाही असेही स्पष्ट केले.

ज्यांची स्वॅब तपासणी केली जाते किंवा जे कोरोनाबाधित म्हणून उपचार घेतात व त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास तोच आत्तापर्यंत प्रशासनाच्या आकडेवारीत देण्यात आला आहे. परंतु मृत्यू पश्चात स्वॅब घेता येत नाही व ‘आय सी एम आर’ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशा मृत्यूची मृत्यूनंतर कोरोनाची चाचणी केलीही जात नाही. त्यामुळे ही नोंद आत्तापर्यंत घेतली गेली नसली तरी, मृत्यूनंतर संबंंधितांच्या छातीच्या एक्सरे मध्ये त्यांना कोरोनाची लागण झालेल्याचे निष्पन्न झाले आहे.

एखादी व्यक्ती आजारपण अंगावर काढते, कोरोनाची लक्षणे असली तरी लपविते अशांच्या बाबतीत मृत्यू पश्चात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच को मॉरबिड (अन्य आजार असलेले) रूग्ण शोधण्यास व त्यांच्यापर्यंत पोहचण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडली असल्याचेही ते म्हणाले. परंतु, याचवेळी कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी आजार लपविणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगत, शहरात कोरोनाचा ‘समुह संसर्ग’ (कम्युनिटी स्प्रेड) झालेला नसल्याचाही दावाही केला आहे.

पुण्यातील न नोंदविल्या मृत्यूची माहिती मुख्यमंत्र्यांनाही दिली.
पुणे शहरात दररोज बारा पेक्षा अधिक मृत्यू हे कोरोनामुळे होतात पण ते कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत गणले जात नाही. ही बाब आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच मृत्यू पश्चात कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे समजत असल्याने, या मृत्यूच्या घटनांची चौकशी करावी व भविष्यात अशाप्रकारे मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्यातबाबत आपण प्रशासनास सूचना द्याव्यात असेही ठाकरे यांना सांगितले असल्याचे मोहोळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button