breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठकीला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यासारखे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.

पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा ते बैठकीत घेणार आहेत. दुपारी मुख्यमंत्री विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला निघाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात दाखल, कोरोना संदर्भात आढावा बैठकीला सुरुवात, अजित पवार, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे शहरात प्रवेश करणार, दुपारी 12.15 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे बैठकीसाठी दाखल

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. स्मार्ट सिटी वॉररुममध्येही ते पाहणी करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी पाच वाजता मुंबईकडे येण्यास निघतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button