breaking-newsमुंबई

मुख्यमंत्र्यांची शिवेसना आमदारांसोबत ४ तास बैठक, रविंद्र वायकर यांची समन्वयक म्हणून निवड

मुंबई –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या आमदार यांच्यात तब्बल ४ तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली असून या बैठकीत रविंद्र वायकर यांची समन्वयक यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतील आमदार आणि मुख्यमंत्री यांच्यामधील समन्वयक म्हणून यापुढे आमदार रविंद्र वायकर काम पाहणार आहेत.

शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांचा योग्य पाठपुरावा झाला नाही. अनेकदा समन्वय होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी असेल. आज झालेल्या बैठकीत रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत समन्वयक म्हणून काम करतील असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यापुढील काळात रवींद्र वायकर शिवसेना आमदारांच्या अडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहेत. रवींद्र वायकर शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

एकूणच उद्धव ठाकरे महाविकासआघाडीचं सरकार चालवत असतानाही पक्षाच्या आमदारांच्या मागण्यांकडे देखील बारकाईने लक्ष देताना दिसत आहेत. तसेच समन्वय व्हावा म्हणून तशा व्यवस्थाही करत आहेत. विशेष म्हणजे तिन पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या या सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनीही नाराजीचे सूर काढले होते. हा अनुभव पाहता उद्धव ठाकरे स्वपक्षीयांकडे अधिक लक्ष देताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button