breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई विद्यापीठाने तुर्तास केली योगश सोमण यांची हकालपट्टी!

आमदार कपिल पाटील याचा विद्यार्थी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग

मुंबई | महाईन्यूज| प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे(एमटीए) संचालक योगेश सोमण यांच्या भोगंळ कारभाराला कंटाळून एमटीएच्या विद्यार्थ्यांनी योगेश सोमण यांच्या विरोधात दिनांक १३ जानेवारी २०, सकाळी १०वा. सुमारास तीव्र आंदोलन सुरू केले, आमदार कपिल पाटील यांनी आंदोलनाला पाठींबा दिला, आंदोलनाची तीव्रता लक्ष्यात घेता विद्यापीठ प्रशासनाने योगेश सोमण यांना तत्काळ रजेवर पाठविण्यात येत आहे. असे लेखी पञ मध्यरात्री ११:30 सुमारास विद्यापीठ कुलसचव डाॅ.अजय देशमुख यांनी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थीकडे सुपूर्द केले

मुंबई विद्यापीठातील ‘एमटीएच्या ‘ विभागात संचालक योगेश सोमण यांचा भोगंळ कारभार सुरु आहे. एमटीएच्या एम ए ला २५ विद्यार्थी घेण्याचे नियम असताना ६० विद्यार्थी कोणत्या नियमानुसार घेतले. तसेच डिप्लोमामध्ये देखील ५० विद्यार्थीना प्रवेश दिला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. आम्हा विद्यार्थीवर एक विशिष्ट विचारधारा थोपवली जात आहे , कि ते ज्या विचाधारेतून येतात , असा आरोप विद्यार्थीनी केली. आम्हाला योग्य प्रकारे नाट्यशास्ञाचे शिक्षण दिले जात नाही, “नाट्यशास्ञ म्हणजे एक ‘च्युत्यप्पा’ असे योगेश सुमण यांचे मत आहे, अश्या असंविधानिक भाषेत नाट्यशास्ञाची खिल्ली उडवली जाते आहे यांची दखल विद्यार्थीनी घेतली. शिक्षण देणारे हंगामी शिक्षक हेच मुळात नाटकाचे शिक्षण देण्याच्या पाञतेचे नाहीत, अश्या शिक्षकांकडून आम्हा विद्यार्थीना शिक्षण दिले जाते आहे.असे आरोप विद्यार्थीनी आंदोलनात केले.म्हणून विद्यार्थीनी भोगंळ कारभार करणा-या एमटीएचे संचालक योगेश सोमण यांच्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.

सकाळी १० वा. सुमारास सुरू झालेले आंदोलन मध्यराञी ११वा. पर्यंत अधिक तीव्र होतं गेले. मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थीनी आणि एमटीएच्या आजी-माजी विद्यार्थीनी याला पाठिंबा दर्शविला. मुंबईतील शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थीच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

आमदार कपिल पाटील म्हणाले” योगेश सोमण या विद्यापीठातून जात नाही, तोपर्यंत आपले आंदोलन चालू ठेवा माझा तुम्हाला पाठिंबा आहे” . त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढत गेली. तीव्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने कुलसचव डाॅ.अजय प्र.देशमुख यांनी
सत्यशोधक समितीचे गठण तातडीने करण्यात येईल. समितीचे कामकाज होईलपर्यत संचालक श्री. योगेश सोमण यांना तत्काळ रजेवर पाठविण्यात येत आहे.उपरोक्त चौकशीचा अहवाल येत्या चार आठवड्यात सादर केला जाईल,असे लेखीपञ आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते एमटीएच्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button