breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास महागण्याची चिन्हं
मुंबई : मुंबई- पुणे आरामशीर प्रवासासाठी ‘शिवनेरी’ बसचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे. एसटी महामंडळाच्या प्रस्तावित भाडेवाढीमुळे मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास १३४ रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. डिझेल दरवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि महामार्गावरील टोलदरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासमोर मांडला.
इतर मार्गावरील साध्या आणि वातानुकूलित बसच्या भाड्यातही वाढ होऊन प्रवाशांच्या खिशाला कात्रीच लागण्याची चिन्हं आहेत. एसटी महामंडळाच्या माहितीनुसार डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. यामुळे सुमारे ४७० कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार आहे.