breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई, कोकण, घाट परिसरात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईकरांनी बाहेर पडताना थोडी काळजी घेणं आवश्यक

मुंबई, कोकण, घाट परिसरात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह देशभरामध्ये आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसायला सुरूवात झाली आहे. दरम्यान हवामान अंदाजानुसार वर्तवलेल्या शक्यतेप्रमाणे आज म्हणजे 22 सप्टेंबरला मुंबई, ठाणे शहर आणि आजुबाजूच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर आयसोलेटेट भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसू शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दरम्यान मागील काही तासांत मुंबईसह आजुबाजूच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर असणार्‍या कोकण परिसरामध्ये घाट माथ्यावर आज ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान तेथे मान्सूनला पुरक वातावरण आहे. सोबत वेधशाळेच्या अंदाजानुसार या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये आज सकाळपासून चांगलाच पाऊस झाल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. काही सखल भागात थोडं पाणी साचण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आज मुंबईकरांनी बाहेर पडताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही पावसाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन संबंधित कार्यालयाकडूनही करण्यात आले आहे. तसेच पावसाच्या अलर्ट्स बाबत सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणार्‍या माहितीवर विश्वास ठेवा असही सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button