महाराष्ट्रमुंबई

मुंबई इंडियन्सने आपली विजयी घोडदौड कायम राखली!

मुंबई – आयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई  इंडियन्सने  आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. नितीश राणा आणि कायरन पोलार्डने केलेल्या घणाघाताच्या जोरावर मुंबईने गुजरात लायन्सवर सहा गडी राखून मात करत यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. सोबतच पाच सामन्यातील चार विजय आणि 8 गुणांसह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
गुजरातने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल पहिल्याच षटकात बाद झाला. पण फॉर्ममध्ये असलेल्या नितीश राणाने (53) जोस बटलरच्या (26) साथीने 85 धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयाची पायाभरणी केली.  पण राणा आणि बटलर पाठोपाठ बाद झाल्याने सामन्यात रंगत आली.
त्यानंतर कायरन पोलार्डने फटकेबाजी करून मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेर पोलार्ड 39 धावा काढून झाला. पण रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने गुजरातला चमत्काराची कोणतीही संधी न देता मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक  जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर पहिल्याच षटकात मॅकक्लेनाघनने ड्वेन स्मिथची विकेट काढत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ब्रॅंडन मॅक्युलम (64) आणि कर्णधार सुरेश रैना (28) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी करत गुजरातला सावरले.
पण रैना आणि मॅक्युलम ठराविक अंतराने बाद झाल्याने गुजरातचा डाव पुन्हा अडचणीत आला. मात्र 26 चेंडूत48 धावा कुटणाऱ्या दिनेश कार्तिंकने गुजरातला 20 षटकात 4 बाद 176 धावांपर्यंत मजल मारून दिली.  मुंबईकडून मॅकक्लेनाघनने दोन तर हरभजन आणि मलिंगाने प्रत्येकी एक बळी टिपला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button