breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईबाहेरून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक

महाराष्ट्रासह देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मुंबईत आता काही प्रमाणात मुंबईत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. मुंबईची रुग्णसंख्या वाढू नये आणि साथ पुन्हा पसरू नये यासाठी महापालिकेने बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्यांसाठी १४ दिवस घरात विलगीकरण सक्तीचे केले आहे. त्यामुळे कोकणात गणपतीसाठी गेलेल्या चाकरमान्यांना गावी आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी विलगीकरण करावं लागणार आहे.

अनलॉकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध विभागांचे सरकारी अधिकारी तसेच अत्यावश्यक कामांसाठी गेलेले नागरिक मुंबईत परतत आहेत. तसेच गणपतीसाठी मुंबई, ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात गेले असून येत्या आठवड्यात आणखी हजारो जण जाण्याची शक्यता आहे. हे नागरिक मुंबईत परतल्यानंतर येताना सोबत करोनाचा संसर्ग घेऊन येऊ नयेत, याची खबरदारी घेण्यासाठी महापालिकेने १४ दिवसांच्या गृह विलगीकरणाची सावध पावले उचलली आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शुक्रवारी याबाबत परिपत्रक काढलं आहे.

मुंबईतून कोकणात गेलेल्या चाकरमान्यांनसाठी ग्रामपंचायतींनी दहा ते चौदा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक केले आहे. त्यामुळे हजारो चाकरमानी महिनाभर आधीच आपापल्या गावी गेले आहेत. पालिकेच्या नवीन नियमांमुळे आता मुंबईत आल्यानंतर आपल्या घरात पुन्हा १४ दिवस विलगीकरण करून घ्यावे लागणार आहे. या नियमातून अत्यावश्यक सेवेतील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात मुभा मिळणार आहे. मुंबईत येण्यापूर्वी दोन दिवस आधी [email protected] या ई-मेलवर माहिती देऊन सेवेत रूजू होण्यासाठी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पालिकेच्या या निर्णयामागे अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी बिहारहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकारी विनय कुमार यांचे विलगीकरण करण्यावरून पालिकेशी झालेला वाद कारण ठरला असल्याचे सांगितले जाते आहे. बाहेरून आल्यानंतर १४ दिवस विलगीकरण सक्तीचे असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर विनय कुमार यांनी आपण तपासासाठी आलो आहे. त्यामुळे विलगीकरण बंधनकारक नसल्याचा दावा केला होता. अखेर सात दिवसांच्या विलगीकरणानंतर पालिकेने शुक्रवारी त्यांची सुटका केली. या पार्श्वभूमीवर आता मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला १४ दिवसांचे विलगीकरण करण्याचा नियम बंधनकारक करण्याचे ठरवण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button