breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोणताही मुख्यमंत्री माझ्याशी कधीही संपर्क करू शकतो आणि कोरोना विषाणू प्रतिकारासंदर्भात त्यांची माहिती देऊ शकतो आणि मते मांडू शकतो. मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आपल्या नाक-तोंडाला घरगुती स्वरुपाचा कापडी मास्क लावला होता. या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या विविध मुख्यमंत्र्यांनीही यावेळी मास्क लावला होता. 

भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा कालावधी येत्या १४ एप्रिलला संपतो आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी केली असल्याचे समजते. 

कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात ७४०० च्या वर गेली आहे. तर आतापर्यंत २३९ जणांचा यामुळे आतपर्यंत मृत्यू झाला आहे. ओडिशा आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी त्यांच्याकडील लॉकडाऊनचा कालावधी आधीच ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button