breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो, या अफवेमुळे 300 नागरिकांचा बळी,1000 जण आजारी

कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाबाबतच्या या अफवेने इराणमध्ये ३०० नागरिकांचा बळी घेतला आहे. मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो अशी अफवा इराणच्या सोशल मीडियावर वेगाने पसरली. या अफवेला खरे मानून अनेकांनी मिथेनॉलचे सेवन केले. त्यामुळेच ३०० नागरिकांचा मृत्यू झाला तर १००० पेक्षा अधिक जण आजारी पडले. 

न्यूज वेबसाइट डेली मेलने इराणच्या माध्यमांचा अहवाल देत सांगितलं की, इस्लामिक रिपब्लिकमध्ये मिथॅनॉलच्या सेवनाने ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १००० लोकं आजारी पडली आहेत. इराणमध्ये मद्यपानास बंदी आहे. मिथेनॉल आम्ली पदार्थ आहे. मिथेनॉल प्यायल्याने ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अशावेळी आली जेव्हा तेहरानमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १४४ लोकांच्या मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

इराणच्या सोशल मीडियावर मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो ही अफवा वेगाने पसरली. लोकांनी यामागचे तथ्य जाणून न घेता अनेक जण ते प्यायले. मिथेनॉलचा वास येत नाही. तसंच त्याला कसलीच चव नसते. मिथेनॉलमुळे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदूला मोठा धोका असतो. ते प्यायल्याने लोकं कोमात जाण्याची शक्यता जास्त असते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button