breaking-newsराष्ट्रिय

मित्राने दात पाडल्याने खाता येईना चिकन-मटण, हत्या करुन घेतला बदला

तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी मित्राला एका जंगलात घेऊन गेला होता. तिथे त्याने डोक्यात दगड घालत मित्राची हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपीने मृतदेह एका गोणीत भरण्याचा प्रयत्न केला. पण शक्य होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर दगडाने ठेचून त्याचे दोन्ही हात आणि पाय वेगळे केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, अटक करण्यात आलेल्या आरोपीने चिकन-मटण खाण्यास न मिळणं हत्येचं कारण असल्याचं सांगितलं आहे. आरोपीचा दात तुटला होता ज्यामुळे त्याला चिकन-मटण खाताना त्रास होत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचं मित्रासोबत भांडण झालं होतं ज्यामध्ये त्याचा दात तुटला होता. मित्राने आरोपीचे दात तोडले होते. यामुळेच संतापलेल्या आरोपीने मित्राच्या हत्येचा कट आखला होता.

मृत मित्राचं नाव सनोज होतं तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आकाश उर्फ डब्बू आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, ६ मार्च सनोजची कोर्टात तारीख होती. यावेळी आरोपी आकाशने त्याच्याशी गोड बोलत आपल्या जाळ्यात ओढलं आणि संगम विहार येथील जंगलात घेऊन गेला. तिथे आधी त्याने सनोजला दारु पाजली. यानंतर मागून डोक्यात दगडाने वार करुन हत्या केली. नंतर मृतदेह एका गोणीत भरुन जंगलात लपवून ठेवला. पण पोलिसांनी अखेर माग काढत आरोपी आकाशला अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button