मावळात शिकारीच्या वासाने बिबट्या पिंजऱ्यात अडकला
सोमाटणे | महाईन्यूज
मावळ तालुक्यातील पाचाणे येथे शेतकरी सुनिल शिंदे यांच्या घराला लागून असलेल्या शेतात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. हा बिबट्याचा वावर गेले काही दिवस झाले ग्रामस्थांच्या निदर्शनास येत होता. दोन दिवसापूर्वी बिबट्याने सुनिल शिंदे यांच्या घरातील कुत्रे फस्त केल्याने ग्रामस्थांनमध्ये घबराट पसरली होती. त्यामुळे यासंबधीची तक्रार श्री. सुनिल शिंदे, श्री. दिपक जाधव, श्री. मनोज येवले, श्री. रामदास येवले, श्री. दत्ता येवले, श्री. संजय शिंदे, श्री. सोमनाथ शिंदे अदि ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
वनविभागाच्या अधिकारी वाघमारे मॕडम यांनी श्री. सुनिल शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे पिंजरा लावला व त्यामध्ये बिबट्याने फस्त केलेले मेलेले कुत्रे ठेवले. काल रात्री दोनच्या सुमारास बिबट्या नेहमीप्रमाणे शिकारीच्या वासाने पिंजऱ्यात घुसला व अडकला गेला. यानंतर सदर बातमी ग्रामस्थानी वनविभागाला कळवली व ग्रामस्थानी सुटकेचा श्वास सोडला आहे.