breaking-newsमनोरंजन

मालिकांचे दीर्घायन

दूरचित्रवाणीवरील काही मालिका जशा प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. तशाच काही मालिका त्यांच्या लोकप्रियतेमुळे दीर्घकाळ सुरू असतात. या मालिका त्या त्या वाहिनीवर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. त्याचबरोबर टीआरपीच्या स्पर्धेतही त्या टिकून राहतात. ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘अँड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पे है’ या दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका इतर मालिकांच्या तुलनेत अधिक टीआरपी राखून आहेत. तसेच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ (२५९१) हा कथाबा कार्यक्रम लवकरच १५ वर्ष पूर्ण करणार आहे. ऑनलाईन माध्यमामुळे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने मर्यादित भागांचाही ट्रेंड छोटय़ा पडद्याने पाहिला. पण सध्यातरी मनोरंजन वाहिन्यांवर पुन्हा एकदा मालिकांचे ‘दीर्घा’यन लोकप्रिय ठरते आहे.

दूरचित्रवाणीवरील काही मालिका जशा प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, तशाच काही मालिका त्यांच्या लोकप्रियतेमुळे दीर्घकाळ सुरू असतात. या मालिका त्या त्या वाहिनीवर आपली वेगळी ओळख निर्माण करतात. त्याचबरोबर टीआरपीच्या स्पर्धेतही त्या टिकून राहतात. ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘अँड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पे है’ या दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका इतर मालिकांच्या तुलनेत अधिक टीआरपी राखून आहेत. तसेच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ (२५९१) हा कथाब’ा कार्यक्रम लवकरच १५ वर्षे पूर्ण करणार आहे. ऑनलाइन माध्यमामुळे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने मर्यादित भागांचाही ट्रेंड छोटय़ा पडद्याने पाहिला. पण सध्या तरी मनोरंजन वाहिन्यांवर पुन्हा एकदा मालिकांचे ‘दीर्घा’यन लोकप्रिय ठरते आहे.

उदयपूरमधील महेश्वरी आणि सिंघानिया या दोन श्रीमंत कुटुंबांची गोष्ट असलेली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका गेली दहा वर्षे बरोबरीच्या इतर मालिकांना टीआरपीमध्ये टक्कर देते आहे. या मालिकेतील अक्षरा आणि नैतिक ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. पुढे काही काळाने या मालिकेतील अक्षराची भूमिका साकारणारी हीना खान आणि नैतिकची भूमिका साकारणारा करण मेहरा या कलाकारांनी ही मालिका सोडली. तसेच काही अन्य सहकलाकारांनीही मालिका सोडली. पण त्यानंतर तितक्याच उमेदीने ही मालिका पुढे सुरू ठेवण्यात आली. अक्षराच्या लग्नापासून सुरू झालेली ही मालिका सध्या अक्षराच्या मुलीच्या (नायरा) सांसारिक आयुष्यातील अनेक घडामोडींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते आहे. पहिल्या भागापासून या मालिकेची पटकथा भावना व्यास लिहिते आहे. पहिला भाग लिहिताना उत्सुकता असायची तेवढी आताही असते, असे ती सांगते. निर्माते राजन शाही या मालिकेकडे एक आशीर्वाद या भावनेने पाहतात. इतकी वर्षे मेहनतीने आणि व्यक्तिरेखांच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ही मालिका अनेक चांगली वळणे घेत आज इथवर आल्याचं ते सांगतात.

दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांचा ‘स्टार प्लस’ वाहिनीला वेगळा इतिहास आहे. याच वाहिनीवर ‘ये है मोहब्बते’ ही मालिका २०१३ पासून सुरू आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी प्रेक्षकांना आवडते आणि इशिमा ही नवी ओळख अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला यामुळेच मिळाली आहे. तसेच ‘कसौटी जिंदगी की’ या आठ वर्षे चाललेल्या मालिकेची दुसरी आवृत्ती ‘कसौटी जिंदगी की २’ या नावाने सध्या सुरू आहे. ही मालिकासुद्धा टीआरपीमध्ये अव्वल असते.

‘झी टीव्ही’ वाहिनीवर ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका २०१४ मध्ये सुरू झाली. या मालिकेतील अभि-प्रग्या या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. ही जोडी आजही प्रेक्षकांना तितकीच प्रिय आहे. ही मालिका टीआरपीमध्ये सतत पहिल्या क्रमांकावर असते. मालिकेत अभि-प्रग्या या जोडीची प्रेमकथा ज्या पद्धतीने खुलवण्यात आली, त्याचाच आदर्श घेत पुढे काही मालिकांनी अभि-प्रग्यासारखी हलकीफुलकी वादावादी आणण्याचाही प्रयत्न केला.

इतर वाहिन्यांच्या तुलनेत ‘सोनी सब’ वाहिनी म्हणजे एक हास्याचा झराच आहे. या वाहिनीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेने सर्वाधिक भाग प्रसारित झालेली भारतीय मालिका म्हणून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये आपले नाव कोरले. या मालिकेतील ‘गोकुलधाम’ सोसायटीमधील सगळ्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेच्या इथवरच्या प्रवासाविषयी वाहिनीचे व्यवसायप्रमुख नीरज व्यास म्हणाले, ही मालिका म्हणजे समाजातील विविध घटनांचं प्रतिबिंब आहे. आपण जसा आरसा बघतो, तसे या मालिकेकडे प्रेक्षक बघतात. या मालिकेत नवनवीन विषय हाताळले जातात. हसता हसता काही तरी वेगळं सांगून जाणं, हे सूत्र कायम ठेवत ही मालिका नेहमीच प्रेक्षकांना ताजेतवाने करते. ही मालिका ज्या प्रेक्षकांना प्राइम टाइमच्या वेळात पाहता येत नाही, त्यांच्यासाठी रविवारी एकापाठोपाठ एक भाग आम्ही प्रसारित करतो, असेही व्यास यांनी सांगितले.

दीर्घकाळ चालणाऱ्या मराठी मालिकांविषयी ‘आयरिश निर्मिती’ संस्थेचे प्रमुख विद्याधर पाठारे म्हणाले, प्रेक्षकांच्या धावपळीच्या आयुष्यातही मालिकांमधल्या व्यक्तिरेखांनी त्यांच्या मनात स्थान मिळवले तर मालिका खूप चांगल्या चालतात. असे प्रेक्षक त्या त्या वेळात ती मालिका टीव्हीवर पाहण्यावर भर देतात. ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’मधील गंगुबाई, ‘चार दिवस सासू’चे मधील रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली सासू, ‘पुढचं पाऊ ल’ मालिकेतल्या अक्कासाहेब, ‘देवयानी’ मालिकेतील देवयानी या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्यामुळे या मालिका दीर्घकाळ चालल्या. त्याचबरोबर त्यांनी लोकप्रियताही मिळवली होती. प्रेक्षकांना आवडलेल्या व्यक्तिरेखा चुकीच्या वागूच शकत नाहीत, अशी प्रेक्षकांची धारणा असते, असेही निरीक्षण पाठारे यांनी नोंदवले. प्रेक्षकांना आवडणाऱ्या व्यक्तिरेखा चुकीच्या वागताना दाखवल्या की प्रेक्षक ती मालिका पाहणे सोडून देतात. त्यामुळे मालिकांमधील व्यक्तिरेखांवर खूप मेहनत घ्यावी लागते, असे त्यांनी सांगितले. मालिकांमधील व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या की ती मालिका दीर्घकाळ चालते. कारण दूरचित्रवाणीवर विषय नाही तर त्या त्या व्यक्तिरेखांमुळे ती मालिका घराघरांत पोहोचते, असे पाठारे यांनी सांगितले.

अशा मालिकांमधील ताजेपणा टिकवण्यासाठी कथानकात बदल करावे लागतात. त्या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळात इतर वाहिन्यांवर कुठल्या मालिका सुरू आहेत, त्यांचाही अभ्यास करावा लागतो. दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या सुरुवातीच्या काळात एखादी नवी मालिका आली की दोन-तीन आठवडे प्रेक्षक त्या मालिकेला रुळण्यासाठी वेळ द्यायचे, पण आता काही मिनिटांत प्रेक्षक एखाद्या मालिकेविषयी चांगले-वाईट मत बनवून मोकळे होतात, अशी माहितीही पाठारे यांनी दिली. ‘सोनी टीव्ही’वर ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सीआयडी’ या मालिका दीर्घकाळ चालल्या. पुढे काही कारणांमुळे ‘सीआयडी’ मालिका बंद करण्यात आली, पण तिची लोकप्रियता मात्र कमी झाली नव्हती.

‘अँड टीव्ही’ वाहिनी २०१५ मध्ये सुरू झाली. तेव्हा या वाहिनीवर ‘भाभीजी घर पे है’, ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेविषयी लेखक रघुवीर शेखावत यांनी सांगितलं की, मालिकेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. तसेच ही मालिका नित्यनेमाने बघावी असे भारतीय घरांतील कित्येक प्रेक्षकांना वाटते, हेच या मालिकेचे यश आहे. या मालिकेतला खटय़ाळपणा प्रेक्षकांना आवडतो. मालिकेतल्या मुख्य चार व्यक्तिरेखांनी त्यांची एक वेगळी शैली निर्माण केली आहे. या मालिकेचे हजार भाग लिहिणे म्हणजे अनवाणी पायांनी माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे होते, असे शेखावत म्हणाले.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कुमकुम भाग्य’, ‘भाभीजी घर पर है’ या १००० ते २००० भागांचा टप्पा ओलांडणाऱ्या महामालिकांच्या अनुक्रमे ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘कुंडली भाग्य’, ‘हप्पु की उलटन पलटन’ या नावाने ‘स्पीन ऑफ’ आवृत्याही सध्या तितक्याच लोकप्रिय होत आहेत.

एकता कपूरच्या बालाजी निर्मिती संस्थेच्या दीर्घकाळ चाललेल्या ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’पासून ते ‘दीया और बाती’ (शशी सुमित प्रॉडक्शन्स), ‘बालिका वधू’ (स्फेअर ओरिजिन) आणि सध्या ५०० ते ६०० भागांचा टप्पा पार केलेल्या मालिकांचा विचार करता कथानकाची लांबण लावणं प्रेक्षकांना आवडत नाही. पण मालिकेतील प्रभावी व्यक्तिरेखांच्या आयुष्यात येणारी आश्चर्यकारक विविध वळणं पाहताना प्रेक्षक त्यात गुंतून जातो, हेही दिसून आलं आहे. एकता कपूरच्या बऱ्याच मालिकांवर टीका होते, परंतु त्यांची लोकप्रियता मात्र कमी होत नाही. ‘ये रिश्ता..’सारख्या सध्याच्या महामालिकांनी मात्र लोकप्रियतेचा आलेख उंचावण्यात यश मिळवले आहे. एकूणच वर्षांनुवर्षे चालणाऱ्या मालिका त्यांच्यातील ताजेपणा टिकवून ठेवल्यामुळे आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्यामुळे टीआरपीमध्ये सरस ठरतात. मालिकांच्या या यशस्वी ‘दीर्घायना’मागे वाहिनी, तंत्रज्ञ, कलाकार अशा सगळ्यांचीच कामगिरी महत्त्वाची ठरते.

मराठी वाहिन्यांवरील मालिकांवर नजर टाकली तर ‘होम मिनिस्टर’ या कथाब’ा कार्यक्रमाबरोबरच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी ’(५७२), ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (९१९), ‘तुझ्यात जीव रंगला’ (८८३) या मालिका टीआरपीमध्ये पुढे आहेत. ‘चला हवा येऊ  द्या’ हा कथाबाह्य़ कार्यक्रम १८ ऑगस्ट २०१४ पासून प्रेक्षकांना हसवतो आहे. ‘झी युवा’ वाहिनीवर ‘फुलपाखरू’ (६८३) आणि ‘कलर्स मराठी’वर ‘घाडगे अँड सून’ मालिकेने ६०० भागांचा टप्पा पार केला आहे. ‘स्टार प्रवाह’वर ‘विठु माऊ ली’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिका गेली दोन वर्षे स्थिरावल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button