breaking-newsराष्ट्रिय

मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप; महागाईचा भडका उडण्याची शक्यता

नवी दिल्ली: डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी आजपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील ६० टक्के ट्रकचालक सहभागी झाले आहेत. तसेच संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘सरकारचं इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्यानं इंधन दरवाढ करण्यात आल्याचं कारण सरकार देत आहे. पण केंद्र सरकार आणि राज्यसरकारांच्या करांमुळे ही दरवाढ झाल्याचं आमचं मत आहे,’ असं ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी सांगितलं. आजच्या संपात ९० लाख ट्रकचालक उतरणार असल्याचंही ते म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये ३.५ लाख ट्रकचालक संपात सहभागी झाल्याचा दावा बंगाल ट्रक ऑपरेटर असोसिएशनचे संयुक्त सचिव सजल घोष यांनी केला.

केंद्र सरकार एक लिटर इंधनामागे आठ रुपये अधिभार आकारते. राज्याकडूनही १०.३० रु. अधिभार आकारला जातो, एक किमी रस्त्यासाठी सरकार आठ रुपये कर घेते. थर्ड पार्टी विमादरातील वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच संप पुकारला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मालवाहतूकदारांचा संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास त्याचा भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button