breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मारहाण करणा-या वडिलांविरोधात मुलीची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल

लोणावळा – प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून डांबून ठेवत वडीलांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, २४ वर्षीय तरुणीने वडिलां विरोधात मारहाणीचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. मुलीच्या तक्रारीवरून वडीलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे एका मुलाशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून सोमवार (ता.२८) ते शुक्रवार (ता.०२) या कालावधीत तरुणीस बाहेर जाऊ न देता डांबून ठेवले, तरुणीचा मोबाईल फोन व लॅपटॉप काढून घेतला. त्या वस्तू वडिलांकडे परत मागितल्या असता वडीलांनी हाताने मारहाण केली असा आरोप करत चोवीस वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी ​त्यानुसार वडिलांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button