“माया 2’मधून शमा सिकंदरची वापसी
विक्रम भटच्या “माया 2′ या वेबसिरीजमधील बोल्ड गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल व्हायला लागले आहेत. आतापर्यंत “ये मेरी लाईफ है’ टिव्ही सिरीयलमधून सिंपल गर्ल म्हणून दिसणारी शमा सिकंदर या वेबसिरीजमध्ये अगदी बोल्ड अवतारात दिसणार आहे. शमा सिकंदरने आतापर्यंतच्या आपल्या रोलचे लुक इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे “माया 2’मधील लुक देखील तिने शेअर केला आहे. आपल्या करिअरच्या सुरूवातीला मॉडेलिंग आणि नंतर टिव्ही सिरीयल करणारी शमा सिकंदर बऱ्याच दिवसांपासून टिव्हीपासून दूर आहे.
युट्युबवर शैलेंद्र सिंहच्या “सेक्सॉहॉलिक’ या शॉर्टफिल्ममध्ये तिने सर्वप्रथम बोल्ड सीन केले होते. त्यामुळेच ती सर्वाधिक चर्चेत आली होती. त्यानंतर “बलवीर’ आणि “भयंकर परी’ नावाच्या सिरीयलमधूनही काम केले होते. दरम्यानच्या काळात “प्रेम अगन’, “मन’, “अंश’ आणि “धूमधडाका’ या सिनेमांमध्येही काम केले होते.
मात्र नंतर तिला “बायपोलर डिसॉर्डर’नावाचा मानसिक रोग जडला होता. तिने या आजारपणाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर आता ती विक्रम भटच्या “माया 2’मधून पुनरागमन करते आहे. तिचा या कमबॅक बोल्ड असणार आहे, हे उघडच आहे.