breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मान्सून 29 मेपर्यंत केरळात!

  • वेधशाळेची अधिकृत घोषणा : अंदमानात 23 मेपर्यंत पाऊस

पुणे – देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला मान्सून यंदा केरळात नियोजन वेळेपेक्षा तीन दिवस आधी म्हणजे 29 मेपर्यंत दाखल होणार आहे, अशी घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी केली. शिवाय अंदमानात आपल्या नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशिरा म्हणजे 23 मे रोजी मान्सून दाखल होईल, असेही अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता देशवासियांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

दरवर्षी मान्सून केरळमध्ये साधारणत: 1 जूनच्या सुमारास धडकतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधीच दाखल होणार आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्‍यक असणारे पोषण वातावरण अरबी समुद्रात निर्माण होत असल्याने मान्सून वेळेआधी दाखल होईल, अंदमानात मात्र तो तीन दिवस उशीरा दाखल होईल. साधारणात: 20 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. पण, यंदा मान्सून दाखल होण्यापूर्वी आवश्‍यक असणारे मोसमी वारे वाहण्यास उशीर झाल्याने हा फरक पडला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन-चार दिवसांत उत्तर आणि पश्‍चिम भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

मान्सून महाराष्ट्रात कधी?
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासांत त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्या वर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणे महत्त्वाचे असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button