breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माढ्यातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांना राष्ट्रवादीकडून मिळणार उमेदवारी?

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसने माढ्याचा उमेदवार निश्चित केला असून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली. प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. प्रभाकर देशमुख माजी सनदी अधिकारी आहेत.

माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्याने, मोहिते पाटील राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यामुळेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी खुद्द शरद पवारांना माढ्यातून निवडणूक लढण्याचा आग्रह केला होता. पवारांनीही आधी लढण्याची घोषणा केली, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. या सर्व पार्श्वभूमीनंतर माढ्याचं तिकीट कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांचा उद्याच भाजप प्रवेश?

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर न झाल्याने मोहिते पाटील गट नाराज आहे. यासाठीच आज अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर आज निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजप उमेदवारी देण्यास तयार आहे. भाजप प्रवेशापूर्वी समर्थकांशी चर्चा करण्यासाठी आज मोहिते पाटलांनी बैठक बोलावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button